American library books » Horror » प्रतिबिंब by अभिषेक दळवी (good books to read for beginners TXT) 📕

Read book online «प्रतिबिंब by अभिषेक दळवी (good books to read for beginners TXT) 📕».   Author   -   अभिषेक दळवी



1 2 3 4 5 6 7
Go to page:
प्रतिबिंब

प्रतिबिंब

``````

मनोगत

मी अभिषेक अनिल दळवी .

भयकथा ,गूढकथांच्या निमित्ताने मराठी साहित्य संपदेत माझ पदार्पण झाल आहे ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे .बालवयात " चांदोबा " पासून निर्माण झालेली वाचनाची आवड कधी माझ्या जीवनाची अविभाज्य भाग बनून गेली हे समजले देखील नाही . वयाच्या चौदाव्या वर्षी ' रत्नाकर मतकरी ' यांचा गूढकथासंग्रह हाती लागला आणि साहित्यातील गूढविश्वात माझे पदार्पण झाले या नंतर ' नारायण धारप ' यांच्या भय कादंबऱ्या वाचत माझा हा सुरू झालेला प्रवास कधी थांबलाच नाही .यांसारख्या प्रतिभावंत लेखकांच्या अप्रतिम लेखनातून , श्वास रोखून धरायला लावणाऱ्या वर्णनातून आणि काळजात धडकी भरावयास भाग पाडणाऱ्या प्रसंगामधून माझ्या मनातही लेखनाची उर्मी निर्माण झाली .यामुळे जर माझ्या लेखणीतून साकारलेल्या कथा वाचकांस आवडत असतील तर याचे सर्व श्रेय मी यांना अर्पण करतो .

सदर कथासंग्रहातील प्रथम कथेत चार मित्रांना मिळालेली त्यांच्या कृत्याची अनपेक्षित शिक्षा , द्वितीय कथेत दोन डिटेक्टीव्हनी सोडवलेले एका हत्येचे रहस्य पण त्यातून निर्माण झालेले नवीन गूढ , तृतीय कथेत एका गृहिणीने कुटुंबाच्या संरक्षणासाठी बुद्धी चातुर्याने अमानवीय शक्तीवर केलेली मात व चतुर्थ कथेत एका शापित वस्तूने होणारी सुखी संसाराची वाताहात हे सर्वच प्रसंग वाचकांना भयविश्वाचा रोमांचकारी प्रवास घडवतील ही आशा व्यक्त करतो .

भयकथा हे मराठी साहित्य संपदेतील महत्वाचे दालन आहे .या कथांमधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवायचा आमचा हेतु नाही .या भयकथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत वाचकांनी त्याच्या निसंकोचपणे आस्वाद घ्यावा ही विनंती

 

 

 

 

 

 

 

अर्पणपत्रिका

जिच्यामुळे माझ्या मनात वाचणाबद्दल गोडी निर्माण झाली आणि लिखाणास वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले त्या माझ्या आईस हे साहित्य कृतज्ञता पूर्वक अर्पण . . .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रस्तावना

भय कथा ,गूढकथांच्या निमित्ताने मराठी साहित्य संपदेत माझ पदार्पण झाल आहे ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे .नारायण धारप ,रत्नाकर मतकरी यांसारख्या प्रतिभावंत लेखकांच्या कथांमुळेच बालपणापासून माझ्या मनात वाचनाची गोडी निर्माण झाली .यांच्या अप्रतिम लेखनातून , श्वास रोखून धरायला लावणाऱ्या वर्णनातून आणि काळजात धडकी भरायला भाग पाडणाऱ्या प्रसंगामधून माझ्या मनातही लेखनाची उर्मी निर्माण झाली .यामुळे जर माझ्या लेखणीतून साकारलेल्या कथा वाचकांस आवडत असतील तर याचे सर्व श्रेय मी यांना अर्पण करतो .

भयकथा हे मराठी साहित्य संपदेतील महत्वाचे दालन आहे .या कथांमधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवायचा आमचा हेतु नाही .या भयकथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत वाचकांनी त्याच्या निसंकोचपणे आस्वाद घ्यावा ही विनंती

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अनुक्रमणिका

 

१) इनामदारीन

२) गूढ

३) मात

४) प्रतिबिंब

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

. . . इनामदारीन . . .

मार्गशीर्ष महिन्यातली रात्र होती पौर्णिमेला दोन दिवस बाकी होते . चंद्राचा प्रकाश चांगलाच पसरला होता .थंडीचा जोर थोडा फार अजूनही वातावरणात होता .सगळी शांतता पसरली होती . गावातल्या घरांकडून शेताकडे पायवाट जात होती त्या वरून एक युवक चालत येत होता त्याच्या पावलागणीक चर्र चर्र वाजण्याऱ्या चामड्याच्या चपला शांततेत विघ्न आणत होत्या .एका हातात वेळूची काठी दुसऱ्या हातात उग्र वासाची विडी ,अंगात बंडी ,मळकट धोतर .तो ओढ्यापर्यंत येऊन पोचला आणि काही क्षण जागीच थबकला इथून जाव की नको हा विचार करत असावा सध्या इथे ज्या गोष्टी घडत होत्या ते पाहून कोणीही घाबरलच असतं पण शेतात जायच तर दुसरा रस्ताच नव्हता ओढ्याच्या कडेने जात पुढे छोटा पूल ओलांडला की शेतजमीन सुरू होतं होती तो पुन्हा चालू लागला उन्हाळा जवळ आला होता त्यामुळे ओढ्याच पाणी अाटत चाललं होतं पाणी अगदी संथ होतं .चंद्राच प्रतिबिंब पाण्यात लख्ख दिसत होतं तो कडेकडेने चालला होता वाऱ्याची मधूनच येणारी मंद झूळक सुखद गारवा देत होती सर्वत्र निशब्द शांतता पसरलेली  वातावरणात कुठेतरी काहूर दाटल होतं ही नैसर्गिक उलाघाल आहे की पुढे होऊ घातलेल्या भयाण सत्यतेची नांदी हे कळत नव्हतं त्याला आपल्या मागे पाण्यात काही हालचाल जाणवली म्हणून त्याच लक्ष गेलं तिथे काही नव्हतं कदाचित भास झाला असेल असं समजून तो पुन्हा चालू लागला काही वेळाने पून्हा हालचाल जाणवली त्याने लक्ष देऊन पाण्यात पाहिलं पण आताही तिथे काही नव्हतं त्याच लक्ष पाण्यातल्या चंद्राच्या प्रतिबिंबाकडे गेलं . ते आता हलल होतं म्हणजे पाण्यात तरंग उमटले होते हा भास नव्हता तर .तो वळून पुन्हा चालू लागला पण थोड्या वेगाने पून्हा त्याला ती हालचाल जाणवली आणि आता तर पाण्याच्या खळखळ ही ऐकू आली न रहावुन त्याच लक्ष गेलच पाण्यातले तरंग त्याच्याच दिशेने आले होते जणू काही कोणीतरी पाण्यातून पोहत त्याचा पाठलाग करत होतं आणि त्याच लक्ष जाताच पाण्यात गुडुप झालं तो थोडा पाण्याजवळ आला " को . . .को कोण हाय रं तिथं . . . . .कोण हाय ?? "त्याचा आवाज ती स्तब्ध शांतता चिरत गेला त्या पाठोपाठ त्याने पाण्यात टाकलेल्या दोन दगडांचा आवाज झाला त्याने हातातली विडी फेकली काठी दुसऱ्या हातात घेऊन तो झपाझप पावलं टाकू लागला पुढंचे दोन क्षण शांततेत गेले म्हणून खात्री करण्यासाठी त्याने पाण्यात पाहिलं आता तशी काहीच हालचाल नव्हती थोडं हायस वाटलं तो पुढे पाऊल टाकणार इतक्यात बुडुक आवाज झाला त्याची मान गर्रकन पाण्याच्या दिशेने वळली एक बुडबुडा पाण्याबाहेर येऊन फुटला तो थोडा जवळ गेला त्या बरोबर अजून बुडबुडे येऊ लागले आणि त्या नंतर जे काही आल ते पाहून त्याची बोबडीच वळली तो झटकन मागे वळून पळू लागला पण पाय अडकला आणि आणि तोंडावर चिखलात आपटला तो पाण्यात घेचला जाऊ लागला पण शिताफीने त्याने आपली बोट किनाऱ्यावरच्या घट्ट चिखलात रूतवीली पण काही उपयोग झाला नाही तो सर्रसर घेचला गेला काही वेळ पाण्यातून बुडबुडे येत राहिले मग हळुहळु पाणीही शांत झाल आता चंद्राच प्रतिबिंब पून्हा दिसु लागलं होतं .सकाळची तीरपी उन्हं डोळ्यावर आली होती पांडबाने डोळे उघडले उठून मस्तपैकी एक आळस दिला बाजुला नाऱ्या झोपला होता ते शेताच्या मधोमध मचानावर झोपले होते .चहूकडे हिरवागार शेतं दिसत होतं नुकतीच टरारलेली हिरवीगार कणस सूर्याच्या तांबूस पिवळसर किरणांनी ती अजूनच खूलून दिसत होती .दूरवर कुठेतरी कोंबडा आरवत  होता 

  पांडबा शेताच्या राखणीसाठी रात्रभर शेतात थांबला होता त्याने उभ राहून चहूबाजूंनी नजर टाकली नाऱ्या अजूनही तसाच ढाराढूर पडला होता पांडबाने त्याच्या पेकाटात एक लाथ घातली .

" नाऱ्या दिस भर हिताच बसायच हाय काय ? उठ " 

" आरं घरी जाऊन तरी काय व्हनार बायकोची पिरपिर नीस्ती " नाऱ्या आळस देत म्हणाला .

" मग बस हितच म्या चाललो " पांडबा कांबळ खांद्यावर टाकून मचानावरून खाली उतरू लागला .

" पांडबा जरा थांब की म्या आलोच थांब " म्हणत नाऱ्याही त्याच्या पाठों पाठ निघाला .

आज त्यांचे दोन साथीदार त्याच्या सोबत नव्हते .नाऱ्या ,पांडबा शेतातून वाट काढत पाय वाटेपर्यंत आले .नुकतीच कोणती तरी बैलगाड़ी इथून गेली होती मातीतले बैलांच्या खुरंाचे ,गाडीच्या चाकांचे निशान याची साक्ष देत होते .समोरून चांदेकर येताना दिसला .खाकी शर्ट पँट , खाकी टोपी , गळ्याच्या बाजूने एका खांद्यावर घेतलेली कापडी पिशवी तो गावचा पोस्टमन होता .आरामात सायकल चालवत येत होता त्यांनी या दोघांजवळ येऊन सायकल थांबवली आणि यांना हाक दिली .पांडबा आणि नाऱ्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले त्या दोघांचे सगळे नातेवाईक गावातच होते त्या मुळे पत्राचा किंवा मनीऑर्डरचा संबध नव्हता आपल्या वाऱ्यालाही न उभा राहणारा माणूस आपल्याला हाका मारतोय पाहून दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले .

" काय र तुमच्यासंग तो नवीन पोरगा व्हता ना त्याच काय झाल " चांदेकरने  विचारलं .

" त्या बेन्याला काय व्हतय हुंदडत आसल गांव भर " नाऱ्या म्हणाला .

" काल रातच्याला राखणीला बोलावलंल अजून पत्ता नाय सुकाळीच्याचा " पांडबा म्हणाला .

" आर मेलेला माणूस कसा येईल राखणीला "

काय ???   पांडबा नाऱ्या दोघे एकदम किंचाळले .

" व्हय . .ओढ्याकड मुडदा पडलाय त्याचा . . .कोणी मारला की स्वतः बुडुन मेला काय समझना झालय म्हणून तुम्हास्नी इचारत व्हतो जावा बघा काय झालय "एवढं बोलून चांदेकर त्याच्या वाटेन पुढे निघून गेला .

चांदेकर जे म्हणाला ते ऐकून नाऱ्या पांडबा दोन क्षण एकमेकांकडे पाहत राहिले आणि लगेच ओढ्याच्या दिशेने धावू लागले .त्या पायवाटेवरून धावत दोघे नदीच्या दिशेने येत होते ओढ्याच्या आसपास गर्दी दिसत होती .सहा सात  बायका घोळका करून उभ्या होत्या हातात धुवायचे कपडे ,बादल्या दिसत होत्या दूसरीकडे पाच सहा लोक हातात गाई म्हशीचे दावणी घेऊन उभे होते त्यांना ओढ्यावर अंघोळ घालायला आणलं असाव समोर गर्दी दिसत होती लोक आपापसात कुजबुजत होती .

" अजून यक बळी गेलो  सोडुचे नाय कोणाक ह्या आता आसाच चालू रवतला मूडदे पडत रवतले " आजुबाजुच्या लोकांची कुजबुज पांडबाच्या कानावर पडली .

गर्दीतून वाट काढत ते दोघे पुढे आले .नदीच पाणी मातकट दिसत होतं किनाऱ्याला चिखलात चंद्याच प्रेत ठेवलं होतं .शरीर पाण्यात बुडाल्यामुळे फुगल होतं ,भिजलेली  मळकट बंडी ,धोतर अंगाला घट्ट चिकटल होतं .ओले केस कपाळावर आले होते ,चेहऱ्या भोवती माश्या घोंगावत होत्या ,बाजुलाच दोन चार  पोलीस उभे होते त्यांचा पंचनामा चालू होता .

  इन्स्पेक्टर पवारांच लक्ष पांडबा आणि नाऱ्याकडे गेल त्यांना पाहून या दोघांनी आपली नजर दूसरीकडे फिरवली यांचे पराक्रम पवारांना चांगलेच माहीत होते त्यांची नजर आपल्यावर पडली पाहून पांडबाने नाऱ्याला नजरेने इशारा केला आणि तो मागे वळला तो इशारा समजून नाऱ्याही त्याच्या मागोमाग वळला ते पवारांची नजर चुकवून गर्दीत मिसळण्याच्या प्रयत्नात होते पण तितक्यात " पांडबा नाऱ्या निघालात कुठे या असे जवळ या तुमचीच वाट बघतोय या " असा मागून आवाज आला .

  मग काय नाऱ्या पांडबा नाईलाजाने मागे वळले .

" आता हे बेनं आपल्याला काय सोडत नाय " नाऱ्या हळूच पांडबाला म्हणाला .

त्या दोघांना येताना बघून पवार बाजूच्या हवालदारांना काहीतरी सांगून बाजूच्या दगडावर जाऊन बसले .

 " काय मला बघून कुठे पळत होतात ? " पवारांनी एक पाय दुसऱ्या पायावर घेत विचारलं . .

" नाय सायेब ते घरी जायच व्हतं म्हणून जरा घाईत . . ." नाऱ्या म्हणाला ." आम्हाला बघून बरी घाई होते रे तुम्हाला घरी जायची " पवार आपला एक हात पायावर घेतलेल्या पायाच्या चकचकित बुटावर फिरवत बोलले .

" आव नाय साहेब तस काय बी नाय जरा सकाळची घाई असतीया म्हणून " पांडबा नाऱ्याला सावरत म्हणाला .

" बर ते जाऊ दे हे हा तुमच्याबरोबरच असायचा ना ? " पवार चंद्याच्या प्रेताकडे बोट दाखवत बोलले .

" आव आयच्यांद सांगतो सायेब आम्ही काय नाय केल ह्याला  आम्हंास्नी काय बी माहीत नाय " पांडबा शपथ घेत म्हणाला .

" अरे मला माहितीये तुम्ही नाही मारला याला कोणाला तरी मारायला हिम्मत लागते ती तुमच्यासारख्या भूरट्या चोरंाकडे कुठे ? "

नाऱ्या आणि पांडबाने एकमेकांकडे पाहून मान खाली घातली .नदीकाठी जमलेली सगळी गर्दी त्यांच्याकडेच पाहत होती आणि ते दोघे कसायाच्या तावडीत सापडलेल्या बोकडासारखे गप्प होते त्यांना तशी लोकलज्जेची पर्वा नव्हती म्हणा ही काही पहिली वेळ नव्हती या आधीही पोलिसांनी त्यांचा चांगलाच पाहुणचार केला होता त्यांना भीती होती ती पवारांचीच कारण ते सहजा सहजी यांना सोडणार नव्हतेच उलट सगळ्यात पहिला संशय यांच्यावर येणार होता .

" चला पटापट सांगा याच्या बद्दल कधी पासून तुमच्याबरोबर आहे शेवटी कधी भेटला होतात "

पवारांनी ओढ्याकाठीच चौकशीला सुरुवात केली ते पाहुन तिकडे जमलेले गावकरी हळुहळु पंागु लागले न जाणो काय ह्या पोलिसाच्या मनात येईल आणि आपल्याला चौकशीला बोलवेल .

 पवारांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली . चंद्याबद्दल पहिल्यापासून सांगताना दोघांच्या नाकीनऊ येत होते त्यांनी अशी कोणती चांगली काम केली नव्हती की ज्या बद्दल एका पोलीसाला उघड उघड सांगावं शेवटी न राहवुन पांडबाने विचारलच .

" आव सायेब एवढी चौकशी कशाला  भेलकंाडुन पडला आसल पाण्यात आणि बुडला आसल " पांडबा म्हणाला .

" व्हय सायेब असाबी बेवडाच व्हता शुद्धीत कुठं असायचा " नाऱ्या पांडबाला दुजोरा देत म्हणाला .

" अरे मुर्खँानो हा बुडुन मेला नाहीये याला बुडवून मारलाय तिकडे बघा " हवालदार जिथे वावरत होते तिथल्या चिखलाकडे बोट दाखवत पवार बोलले .

  तिथला घट्ट चिखल घुसळल्या सारखा दिसत होता एखाद्या मांजरिने झाडावर बेसावध बसलेल्या कबूतरावर हल्ला करावा तरीही त्या कबूतराने बचावात्मक रितीने आपल्या पंज्याची नखे झाडाच्या खोडात घट्ट रूतवावी पण तरीही मांजराने जोरात हीसडा देऊन त्यास घेऊन जावे आणि झाडाच्या फांदीवर त्याचे ओरखडे दिसाव तसे त्या चिखलात चंद्याच्या बोटांचे ओरखडे दिसत होते .

   चंद्याने स्वतः ला वाचवायचे फार प्रयत्न केले होते पण ते जे कोणी होतं त्याने त्याला जोरात पाण्यात घेऊन बुडवून मारलं होतं चंद्याच्या पायाच्या पोटरीवर ज्याने खून केला होता त्याच्या नखांचे ओरखडे दिसत होते .ते पाहुन नाऱ्या आणि पांडबाला कुश्याची आठवण झाली त्याचाही खून असाच झाला होता दोघांनाही घाम फुटला .

"आता बोला तुमच्या दोन साथीदारांचे खून एकाच रितीने तसेच निर्घुणपणे केले आहेत तुमचं काय म्हणणं आहे " पवार उठून दोघांच्या जवळ आले त्यांच्या खांद्यावर हात ठेवत बोलले .

नाऱ्या आणि पांडबाची तर बोबडीच वळली होती .

" ज्याने कोणी ह्याला मारलय तो तुमचाही दुश्मन आहे नाहीतर तुम्हीच याला मारलय आता सांगा नक्की काय प्रकरण आहे हे "

पांडबा आणि नाऱ्या एकमेकांकडे गप्प राहून फक्त पाहत होते दोघांकडे बोलण्यासारख काही नव्हते .काही वेळापासून तिथल्या हवालदारंापैकी एक जण ह्यांच्या जवळ घुटमळट होता त्याला कदाचित काही तरी बोलायचे  असावे पण हिम्मत होतं नव्हती पवारांच कधी पासून त्याच्याकडेच लक्ष जातच होतं .

" माने इकडे काही मुजरा चाललाय का ? मघास पासून चोरून चोरून बघताय ते "पवारांनी न राहवुन विचारलच .

तसा तो हवालदार जवळ आला 

" सायेब जरा बोलायच होतं " माने बोलले जस काय ते कधी पासून याच क्षणाची वाट पाहत होते की कधी एकदा हा माणूस आपल्याला बोलावतोय आणि आपण ह्याला सर्व सांगतोय .

" बोला ऐकतोय मी " पवार त्यांच्याकडेच न पाहता बोलत होते .

" सायेब ही केस दिसती तशी नाय इतक्या वर्षात पहिल्यांदा अस बघतोय मी "

" म्हणजे " मानेकडे बारीक नजरेने पाहत पवार बोलले .

"जरा बाजुला या सायेब

1 2 3 4 5 6 7
Go to page:

Free e-book: «प्रतिबिंब by अभिषेक दळवी (good books to read for beginners TXT) 📕»   -   read online now on website american library books (americanlibrarybooks.com)

Comments (0)

There are no comments yet. You can be the first!
Add a comment